चंद्रपूर बद्दल 

चंद्रपूर जिल्हा प्रथमता इंद्पूर नावाने ओळखला जात होता, ते नाव बदलून पहिले लोकपुर ठेवण्यात आले व नंतर चांदा नावाने ओळखला जाऊ लागला. हा जिल्हा ब्रिटीश कालावधीत चांदा जिल्हा म्हणून संबोधला जात होता जे कालांतराने, १९६४ चे आसपास, बदलवून मूळ नाव चंद्रपूर करण्यात आले. प्रदेशात इतर स्थळे प्राचीन वेळी वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्खंडा यांचा समावेश आहे. हिंदू आणि बुद्धिस्ट राज्यान्ही क्षेत्रावर बराच काळ राज्य केले. त्या नंतर गोंडराजांनी ९ व्या शतकाचे सुमारास १७५१ नंतर मराठी काळाचे सुरुवातीस राज्य केले अखेरचा राजवंशी राजा राघुशी भोसले याचा मृतू १८५३ मध्ये झाला. नागपूर आणि चंद्रपूर एकत्र ब्रिटीश साम्राज्य म्हणून घोषित केले.


१८५४ मध्ये चंद्रपूर स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला आणि १८७४ मध्ये या जिल्ह्यात तीन तहसिल मुल, वरोरा आणि ब्रम्हपुरी समाविष्टीत करण्यात आले. १८७४ साली, तथापि, मद्रास वरच्या गोडवाई जिल्हा कमी करून आणि चार तहसिली चंद्रपूर मध्ये जोडण्यात आले. मुख्यालय म्हणून सिरोंचा एक तहसील ठेवण्यात आली. १९८५ मध्ये एका तहसील मुख्यालयाचे मुल वरून चंद्रपूर हस्तांतरण करण्यात आले व १९०५ मध्ये नवीन तहसील मुख्यालयासह गडचिरोली येथे ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर तहसील पासून जमीनदारी मालमत्ते सह हस्तांतरित करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनदारीचा लहान हिस्सा नव्याने अस्तित्वात आलेल्या जिल्ह्यास १९०७ मध्ये हस्तांतरित करण्यात आला. त्याच वर्षी तीन विभाग नावे चरेला, अल्बक आणि नुगीर एकूण क्षेत्रफळ १५६० चौ कि.मी. मद्रास राज्यात हस्तांतरित करण्यात आले.


कोणतेही जास्त बदल न करता १९११-१९५५ दरम्यान जिल्हा किंवा त्याच्या तहसिली सीमेमध्ये आल्या. १९५६ मध्ये राज्य पुन्हसंयोजना योजनेचा परिणाम म्हणुन जिल्हा मध्यप्रदेश राज्यातून बॉम्बे राज्यास हस्तातरीत करण्यात आला. त्याच कालावधीत हैद्राबाद राज्याचा आदिलाबाद जिल्ह्याचा भाग राजूरा तहसील नांदेड जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्यात १९५९ मध्ये हस्तांतरीत करण्यात आले. मे १९६० महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासून जिल्हा या राज्याचा भाग झाला. प्रशाकीय सोईसाठी आणि औद्योगिक व शेती विकासा करिता १९८१ जणगणने नंतर जिल्ह्याची विभागणी चंद्रपूर आणि गडचिरोली अशी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात आता असलेल्या तहसिलीमध्ये चंद्रपूर, मुल, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, गोंडपिपरी, पोम्भूर्णा, राजुरा, कोरपना, बल्लारशा आणी जिवती यांचा समावेश आहे.


चंद्रपूर हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहरात प्राचीन स्थळे जसे की वैरागड, कोसाळा, भद्रावती आणि मार्खंडा यांचा समावेश आहे, तसेच शंकराचे (अंकलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे देखील आहेत चंद्रपूर पट्टा खनिजसंपत्तीने समृद्ध असून चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरात उच्च दर्जाचा कोळसा मुबलक प्रमाणात आहे. म्हणून संपूर्ण भारतात चंद्रपूर Black Gold City (काळ्या सोन्याचे शहर) ह्या नावाने ओळखले जाते. 

महसूल

आर. टी. एस सेवा

          

                   मा. आयुक्त

              श्री. विपीन पालिवाल

चंन्द्रपुरकरांना आवश्यक सेवा-सुविधा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देणे, या हेतूने या. संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमांचा सर्व नागरिकांनी वापर करावा.

आगामी किंवा चालू घडामोडी

आरआरआर सेंटर इवेंट 





Important Links & Social Media Links